Medical workers (Photo Credits: IANS)

मुंबई (Mumbai) शहरामध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 2,211 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमितांची संख्या 1,82,077 वर पोहोचली आहे. आय सी एम आर पोर्टलवरील रिकंसीलेशन नुसार 676 बाधित रुग्ण दुहेरी नोंद असल्यामुळे प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत. आज मुंबईमध्ये कोरोनाचे तब्बल 5,105 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याप्रकारे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,42,769 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 30,512 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 50 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 8,422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एएनआय ट्वीट -

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 41 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 37 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. 8 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 42 जणांचे वय 60 वर्षा वर होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 78.4 टक्के आहे. 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1,24 टक्के आहे. 18 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 9,90,940 झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 56 दिवसांवर आला आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 18 सप्टेंबर नुसार मुंबईमधील सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 572 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 9,968 आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात आज 21,907 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23,501 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 8,57,933 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,97,480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.22 % झाले आहे.