महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,788 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,57,410 वर पोहोचली आहे. आज मुंबई मधून कोरोनाचे 1541 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत एकूण 1,25,019 बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 24,144 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 31 कोरोनाच्या बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, यश एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 7,897 वर पोहोचली आहे. बीएमसी (BMC) ने याबाबत माहिती दिली.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 25 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 21 रुग्ण पुरुष व 10 रुग्ण महिला होत्या. यातील 2 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 21 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.03 टक्के आहे. 6 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 8,34 344 इतक्या आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 67 दिवस आहे.
बीएमसी ट्वीट -
7-Sep, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/1Ac6zRkxQR
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 7, 2020
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 6 सप्टेंबर नुसार सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 573 आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती 6,825 इतक्या आहेत. दरम्यान, सामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे 700 रुपये कमी करण्यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये होणार आहे. आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 1200, 1600 आणि 2000 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आलेअसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.