
आज पुन्हा एकदा मुंबई (Mumbai) शहरामध्ये कोरोना विषाणूच्या (Coronavirus) रुग्णांनी हजाराचा आकडा पार केला आहे. आज मुंबईमध्ये 1,432 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,43.389 वर गेली आहे. आय सी एम आर पोर्टलवरील रिकंसीलेशन नुसार 142 बाधित रुग्ण प्रगतीपर अहवालातून कमी करण्यात आले आहेत. आज शहरामध्ये कोरोनाचे 682 रुग्ण बरे झाले आहे, यासह आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 1,15,500 इतके आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोनाच्या 19,974 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 31 रुग्णांचा मृत्त्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 7,593 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 22 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 23 रुग्ण पुरुष व 8 रुग्ण महिला होत्या. त्यातील 1 चे वय 40 वर्षा खाली होते, 18 जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.79 टक्के आहे. 28 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,53,869 इतक्या आहेत. यासह सध्या मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 88 दिवस आहे. (हेही वाचा: पुणे शहरात आज एका दिवसात 1,657 जणांंची कोरोनावर मात, एकुण कोरोनाबाधितांंची आकडेवारी इथे पहा)
बीएमसी ट्वीट -
29-Aug, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/7SeAj3rvo9
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 29, 2020
नुकतेच सिंगापूरच्या Temasek फाउंडेशनने कस्तुरबा रुग्णालयाला व्हेंटिलेटर, ईसीजी मशीन, ऑक्सिमीटर, पीपीई किट, सेन्ट्रीफ्युग मशीन व आवश्यक औषध्ये पुरवली आहेत. यामुळे इथल्या रुग्णांचे बरे होण्याचे ओरमान नक्कीच वाढू शकते. दरम्यान, महाराष्ट्राबाबत बोलायचे तर, राज्यात आज कोरोनाचे एकुण 16,867 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, यानुसार राज्यातील एकुण संक्रमितांची संख्या 7,64,281 झाली आहे. आज राज्यात 328 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 24,103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 11,541 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 5,54,711 रुग्ण बरे झाले आहेत.