Coronavirus in Mumbai: मुंबईत आजही कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ कायम! 1121 नवे कोविड-19 रुग्ण तर 6 जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: Twitter)

मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आजही ही वाढ कायम असून त्यात 1121 नव्या रुग्णांची भर पडली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 734 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3,28,740 इतकी झाली असून एकूण 11,482 मृतांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 3,06,373 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 10,010 इतके सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे.

मुंबईचा कोविड-19 रिकव्हरी रेट 93 टक्के असून आतापर्यंत 33,31,942 इतक्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबरपासून कमी झालेला कोरोनाचा प्रभाव मागील महिन्यापासून पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंताही वाढली आहे. (Lockdown in Mumbai: मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? पहा, काय म्हणाले पालकमंत्री अस्लम शेख)

BMC Tweet:

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टसिंग पाळणे या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसंच येत्या काही दिवसांचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक भागात नाईट कर्फ्यू सह इतर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुंबई लोकल, परीक्षा, सिनेमागृह याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.