Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा (Coronavirus In Maharashtra) आकडा दिवसागणिक वाढत आहे. काल गुरुवारी, 28 मे रोजी राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 2598 नवीन प्रकरणांची भर पडल्याने आता एकूण संख्या ही 59546 इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात राज्यात 698 कोरोना संक्रमितांनी या जीवघेण्या विषाणूवर मात केली ज्यानुसार आजवर कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या ही 18616 इतकी झाली आहे. सद्य घडीला राज्यात 38939 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून याशिवाय अन्य 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही मुंबई (Mumbai), पुणे (Pune) या शहरात आहे, याशिवाय ठाणे (Thane), नाशिक (Nashik), औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण ही झपाट्याने वाढत आहेत, कोकणातून (Konkan)  हद्दपार झालेला कोरोना सुद्धा आता परतल्याने तिथेही चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील या विविध जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात कोरोनचे किती रुग्ण आहेत हे आता आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार सर्व जिल्ह्यांचे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यापकी तुमचा जिल्हा हा कोट्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील कोरोनाचे ताजे अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

 

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 35485 1135 8650
ठाणे 8220 155 2300
पुणे 6896 301 3242
औरंगाबाद 1370 60 879
नाशिक 1043 52 755
रायगड 944 26 488
पालघर 825 23 273
सोलापुर 711 59 303
अकोला 529 28 250
जळगाव 526 52 239
नागपुर 495 9 336
सातारा 429 16 128
कोल्हापुर 351 1 36
रत्नागिरी 204 5 76
अमरावती 197 14 90
हिंगोली 143 0 92
धुळे 129 9 67
यवतमाळ 116 0 92
नांदेड 108 6 69
लातुर  107 3 50
सांगली 101 1 46
अहमदनगर 92 6 48
जालना 87 0 24
बुलढाणा 55 3 28
उस्मानाबाद 54 0 12
गोंदिया 51 0 1
बीड 41 0 3
परभणी 40 1 1
नंदुरबार 32 3 20
गडचिरोली 28 0 0
चंद्रपुर 25 0 5
भंडारा 20 0 1
सिंधुदुर्ग 19 0 7
वर्धा 11 1 0
वाशिम 8 0 5
एकुण 59546 1982 18616

दरम्यान, कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असताना आता लॉक डाऊन 5.0 ची घोषणा सुद्धा लवकरच होऊ शकते अशी शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आपण लॉक डाऊन चे नियम हळूहळू शिथिल करून आता व्यवसाय आणि उद्योग सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहोत असे सांगितले होते, ज्यानुसार आता 1 जून पासून महाराष्ट्रात नेमकी काय परिसतहोती असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.