कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी केले आहे. तरी देखील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अशीच एक घटना महाराष्ट्र राज्यातील जळगाव (Jalgaon) येथून समोर आली आहे. जळगाव मधील आझाद नगर (Azad Nagar) येथे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर बाईकने फिरताना एका व्यक्तीने व्हिडिओ शूट केला. त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
लॉकडाऊन काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मात्र तरीदेखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. अशा वेळी पोलिसांना कारवाई करणे भाग पडत आहे. (बीड: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर घराबाहेर थांबण्यास विरोध केल्याने पोलिसांना टोळक्याकडून मारहाण)
ANI Tweet:
Maharashtra: A man was taken into custody by Police yesterday in Jalgaon's Azad Nagar, after he shot a video of himself riding a motorcycle during the curfew imposed in the state in the wake of #CoronavirusLockdown pic.twitter.com/8681kz9gSr
— ANI (@ANI) March 27, 2020
यापूर्वीही विविध ठिकाणांहून अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. गरजेशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिस अडवत आहेत. मात्र अडवणूक केल्यास लोक पोलिसांशी वाद घालत आहे. तर कधी त्यांच्यावर हल्ला करत आहेत. दरम्यान पोलिस, डॉक्टरांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.