Coronavirus in Maharashatra: मुंबई मधील नालासोपारा येथे 65 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे सावट अधिक गडद होत आहे. रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असताना आता मृतांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई (Mumbai) मधील नालासोपारा (Nalasopara ) येथे काल रात्री एका 65 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 781 रुग्ण आढळून आले आहेत. तसंच या संख्येत सातत्याने भर पडत आहे. आजच्या दिवसात राज्यात 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4000 च्या पार गेला आहे. (महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस च्या 33 नव्या प्रकारणांमुळे रुग्णांची संख्या 781 वर; मुंबई, पिंपरी- चिंचवड मधील बाधितांची आकडेवारी पहा)

मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता 23 हॉस्पिटल्समध्ये अलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच महाराष्ट्रातील 30 रुग्णालये कोरोनाग्रस्तांसाठी घोषित करण्यात आली असून तिथे कोरोना ग्रस्तांवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्याच हॉस्पिटलमध्ये जावून तपासणी करा. इतर हॉस्पिटलमध्ये जाणे टाळा. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. (कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मुंबई मधील 23 हॉस्पिटल्समध्ये अलगीकरण सुविधा; पहा हॉस्पिटल्सची संपूर्ण यादी)

ANI Tweet:

कालच्या दिवसात पुण्यात कोरोना व्हायरसने 3 जणांचा बळी घेतला. त्यापैकी दोन रुग्णांचे वय 52 आणि 60  वर्षे असे होते. कोरोनामुळे मृत्यू पडलेल्यांमध्ये वृद्ध, जेष्ठ नागरिक अधिक आहेत. तसंच मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार असल्यास कोरोनाचा प्रभाव अधिक तीव्र होत असल्याचे आतापर्यंतच्या गेलेल्या बळींवरुन दिसून आले आहे.