Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आज धारावी (Dharavi), महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus)  संक्रमित 50 नवीन प्रकरणे उघडकीस आले आहेत. यासह, येथे कोरोना बाधितांची एकूण संख्या 783 वर पोहचली आहे. या ठिकाणी आजवर कोरोनामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर आज कोणत्याही नवीन मृत्यूची नोंद झाली नाही, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाने (BMC) दिली. दुसरीकडे, महाराष्ट्रात आज 1,362 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यात कोरोना बाधितनाची संख्या 18,120 वर पोहचली असल्याचे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली. देशातील कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांच्या पलीकडे गेली असून मागील 3 दिवसात संक्रमितांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. 4 मे रोजी देशात 41 हजार लोक संक्रमित झाले होते, जे आता वाढून सुमारे 53 हजार झाले आहेत. लॉकडाउनपासून संक्रमित लोकांची संख्या 52 हजार 952 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशांत 1783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (मुंबई विमानतळावरील CISF हेडकॉन्टेबलची कोरोनाची लागण झाल्यानंतर आज मृत्यू)

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी 24 मार्च रोजी लॉकडाउन लागू करण्यात आले होते आणि तो 17 मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार मुंबईत तैनात सीआयएसएफच्या 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला. एका वरिष्ठ अधिका्याने गुरुवारी ही माहिती दिली. कोविड-19 ने संक्रमित 32 जवानांवर उपचार सुरू असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, मृतक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात होता. त्याच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते, जेथे त्याचा मृत्यू झाला.

शिवाय, आज मुंबईतील सायन रुग्णालयात कोविड-19 वॉर्डमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओत कथित रुपात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारी मृत शव सुद्धा दिसून येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर मुंबई महापालिकेने या संदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. कथित रुपात कोविड-19 वॉर्डमध्ये कमीत कमी अर्धा डझन शव बेडवर पडल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे. तेथेच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. मृतदेह काळ्या प्लस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळल्याचे दिसून येत आहे. काही मृतदेहांवर कापड टाकल्याचे ही दिसत आहे. नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला.