Coronavirus In Maharashtra: पहिली ते आठवी च्या परीक्षा रद्द; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Education Minister Varsha Gaikwad (PC - Twitter)

कोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर यंदाच्या 1 ते 8 वी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. वर्षभरातील गुणवत्ता मूल्यांकन करून त्यानुसार विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.  तसेच 9  वी आणि 11 वी च्या परीक्षा या 15  एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर 15 एप्रिल नंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्या म्हणाल्या.कोरोनच्या वाढत्या भीतीत समाधानाची बाब म्हणजे राज्यातील कोरून बाधित रुग्णांपैकी 5 जणांना विषाणूमुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. CM Uddhav Thackeray on Coronavirus: मुंबई, पुणे, पिंपरी, नागपूर मध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व खाजगी कंपन्या 31 मार्च पर्यंत राहणार बंद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दुसरीकडे, दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकात संपवण्यात येतील. दहावीचे आता केवळ दोन पेपर शिल्लक आहेत त्यामुळे या वेळापत्रकत बदल करण्यात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 52 रुग्ण आढळले आहेत, या पार्श्वभूमीवर अगोदरच राज्यातील सर्व शाळा- कॉलेजेस 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, यासोबतच आता परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे, केवळ दहावी आणि बारावी सोडून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील काही काळात दहावीचे पेपर घरून तपासता येण्याबाबत विचारणा झाली होती, मात्र यामध्ये गैरप्रकार वाढण्याची शक्यता अधिक असल्याने ही परवानगी देता येणार नाही मात्र त्याऐवजी सुरक्षित ठिकाणी वेगवेगळे बसवून शिक्षकांसाठी सोयीची तरतूद करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे सांगण्यात आले आहे.