Coronavirus: दिलासादायक बातमी; महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, वाशीम जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत एकाही रुग्णांची नोंद नाही
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले असताना राज्यातील लातूर (Latur), उस्मानाबाद (Osmanabad), हिंगोली (Hingoli) आणि वाशीम (Washim) येथील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशीम येथे गेल्या 14 दिवसांमध्ये एकाही कोरोनाबाधित रग्णांची नोंद झाली नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच लवकरच कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येणार, अशाही विश्वास आरोग्य विभागाने दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे देखील वाचा- Coronavirus Updates: मुंबईतील धारावीत कोरोनाचे नवे 13 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2043 वर पोहचल्याची महापालिकेने दिली माहिती

ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ पाहता प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे.