Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील धारावीत (Dharavi) कोरोनाते आणखी 18 रुग्ण आढळल्याने आकडा 2993 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास महापालिकेला यश आल्याचे दिसून आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा धारावी पॅटर्नचे कौतुक केले होते. तसेच अद्याप ही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहेत.(Coronavirus in Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 434 नवे कोरोना बाधित; 4 जणांचा मृत्यू)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून विविध जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच सध्या सरकारने कोरोनाची चाचणीचे दर सर्वसामान्यांना परवडावेत यासाठी त्याच्या किंमती कमी केल्या आहेत. तसेच कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून कोविड सेंटरसह क्वारंटाइन सेंटर्स उभारण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरीही मृत्यूदर कमी झाल्याचे त्यांनी म्हटले होते.(Coronavirus Update in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत 405 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील मृतांचा एकूण आकडा 31 हजार 791 वर)

कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. तसेच जगभरातील डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. तसेच कोविड19 वरील अद्याप लस उपलब्ध झाली नसल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे. पण सीरम इंन्सिट्युट ऑफ इंडिया यांनी 2024 च्या अखेर पर्यंत लस उपलब्ध होईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुंबईत 17 सप्टेंबर पासुन 30 सप्टेंबर पर्यंत शहरात जमावबंदी लागु करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली मात्र त्यातील बंदी हा शब्द वाचुन अनेक जण संभ्रमात पडले आहेत. आता पुन्हा लॉकडाउन कठोर होणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले असतील या सगळ्या पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी  ट्विट करुन उत्तर दिले होते. कलम 144 लागु असताना मुंबईकरांनी घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही यापुर्वी 31 ऑगस्ट पर्यंत लागु असलेली जमावबंदीच पुढील काही दिवस लागु राहणार आहे. यात कोणताही नवा नियम लागु केलेला नाही असे आदित्य यांनी ट्विट करत म्हटले होते.