मुंबईच्या धारवी भागामध्ये आज (1 ऑगस्ट) मागील 24 तासांमध्ये 4 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मागील महिन्याभरापासून धारावीमध्ये कोरोना व्हायरस फैलावावर नियंत्रण मिळवण्यामध्ये प्रशासनाला यश आलं आहे. सध्या धारावीमध्ये अॅक्टीव्ह रूग्णांची एकूण संख्या 72 आहे. तर आतापर्यंत धारावी भागातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2560 पर्यंत पोहचला आहे.
सुमारे तीन महिन्यांपूर्वी म्हणजे 1 एप्रिल दिवशी धारावीमध्ये पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला होता. त्यानंतर दाटीवाटीच्या असलेल्या या भागामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्यास त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र राज्य सरकार, पालिका प्रशासन, स्वयंसेवी संघटना आणि धारावीवासिय यांनी एकत्रितपणे संयमाने हा व्हायरसचा मुकाबला केला. Dharavi Model: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख Tedros Adhanom यांनी कौतुक केलेलं 'धारावी मॉडेल' नेमकं काय? आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी कशी मिळवतेय COVID 19 वर नियंत्रण.
4 new cases of coronavirus reported in Mumbai's Dharavi today. Active cases in the area now stand at 72. Total number of positive cases in Dharavi is 2560: Brihanmumbai Municipal Corporation pic.twitter.com/ffvj3exMKD
— ANI (@ANI) August 1, 2020
केंद्रीय आरोग्य पथक देखील धारावी मध्ये जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. दरम्यान धारावीत होम क्वारंटीन शक्य नसल्याने तात्काळ कोरोना बाधितांच्या हाय रिस्क कॉन्टक्स असणार्यांना इंस्टिट्युशनल क्वारंटीन करण्याचा प्लॅन बनवण्यात आला होता. त्यानुसार अंमलबजावणी करत आता धारावीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले आहे.
धारावी प्रमाणेच मुंबईमध्येही कोरोनाचा फैलाव रोखण्यात पालिकेला यश मिळताना दिसत आहे. सध्या मुंबईचा डबलिंग रेट 76 दिवसांच्या पार गेला आहे. तर रूग्ण बरे होण्याचा दर देखील सुधारत आहे.