Coronavirus in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आज दुहेरी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने 14 जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधांमध्ये (Maharashtra New COVID-19 Guidelines) मोठ्या प्रमाणामध्ये शिथिलता दिली. दरम्यान, राज्यात आज कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित असलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णाचा (COVID-19 Patient) दिवसभरातील मृत्यूदर आज शून्यावर आला. त्यामुळे एका बाजूला राज्य सरकारने कोरोना निर्बंधांमध्ये दिलेली शिथीलता आणि दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णांचा शून्यावर आलेला मृत्यूदर अशी दुहेरी आनंदवार्ता राज्यातील नागरिकांना मिळाली आहे. महत्त्वाचे असे की, 1 एप्रील 2022 नंतर पहिल्यांदाच असेल घडले आहे की, राज्यात दिवसभरात एकाही कोरोनारुग्णाचा मृत्यू झाला नाही.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यातील 11 कोटी जनतेच्या सहकार्याने आणि मदतीने कोरनाविरुद्धची लढाई आपण सहज जिंकू, असा मला विश्वास आहे. राज्यात 1 एप्रिल 2022 पासून प्रथमच असे घडले आहे की, दिवसभरात कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू आढळला नाही. राजेश टोपे यांनी या वेळी कोरोना महामारी काळात रुग्णांची सेवा करताना संक्रमित होऊन मृत्यू झालेल्या सर्व डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ यांचे कृतज्ञापूर्वक स्मरण केले. (हेही वाचा, Maharashtra New COVID-19 Guidelines: कोरोना निर्बंध शिधील,14 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृहे, सिनेमागृहे 100% खुली)

ट्विट

ट्विट

दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबई महापालिकेने माहिती देताना म्हटले आहे की, पाठिमागील 24 तासात मुंबई महापालिका हद्दीत 100 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर 168 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. महत्त्वाचे असे की, 24 तासांमध्ये एकाही कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाला नाही. मुंबईत सक्रीय असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 689 इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.