Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) धारावी (Dharavi)  परिसरात कोरोना व्हायरसमुळे चौथा बळी गेल्याचे समजत आहे, 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात  (Kasturba Hospital) कोरोनामुळे (Coronavirus)  मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण धारावीत आढळून आला होता. त्यानंतर तपासणीची सुरुवात करताच सद्य घडीला धारावीत कोरोनाचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, महाराष्टर मागील 12 तासात कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 1666 वर पोहचला आहे. Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? किती जणांचा मृत्यू? घ्या जाणून

प्राप्त माहितीनुसार, मुंबई मध्ये कोरोनच्या चाचणीची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते, यानुसार आज पासून धारावी भागात लोकांचे स्क्रिनिंग करण्यास सुरुवात झाली आहे. आज 150 डॉक्टरांची एक टीम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत धारावी भागात तपासणीसाठी रुजू झाली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावी भागाला भेट दिली होती, यावेळी आमदार वर्ष गायकवाड यादेखील उपस्थिती होत्या, धारावी हा एकूणच दाटीवाटीचा परिसर असल्याने त्यात लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्यात अडचणी येत असणार, तरीही अनेक भाग हे कंटेनमेंट किंवा बफर झोन म्हणून घोषित करून विनाकरण गर्दी होणार नाही याची दक्षता बाळगली जात आहे. धारावीत नागरिकांना घरपोच भाजीपाला आणि किराणा माल मिळेल याची खात्री केली गेली आहे.