मुंबई मध्ये स्थित बिल्डर मेहुल संघवी (Mehul Sanghavi) यांनी कोरोनाव्हायरस विरुद्ध लढ्यात एक अत्यंत महत्वाचे आणि मोठे योगदान दिले आहे.प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच संघवी यांनी मालाड (Malad) भागातील आपली नव्याने बांधलेली 19 माल्यांची इमारता बृहन्मुंबई महानगरपालिकडे (BMC) सोपवली आहे. या ठिकाणी क्वारंटाईन केंद्र (Quranatine Center) उभारण्यात आले असल्याची माहिती आहे. मुंबई मध्ये कोरोना व्हायरसचे (Coronavirus In Mumbai) वाढते आकडे पाहता आपणही काहीतरी मदत करावी अशी इच्छा होती, एकीकडे कोरोना रुग्ण वाढताना रुग्णालयात जागा कमी पडत असल्याने आपली इमारत कोव्हीड केअर सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असे श्रीजी चरण कंपनीचे मेहुल संघवी यांनी सांगितले. Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत महिलांच्या तुलनेत पुरुषांचा टक्का अधिक; पहा लेटेस्ट आकडेवारी
संघवी यांनी बिझिनेस इनसाइडरला सांगितले की ही एक अवघड वेळ आहे, देश महामारीशी लढत आहे. मुंबईत तर कोरोनाचा उद्रेकच झाला आहे. मालाड सुद्धा एक कोरोना हॉटस्पॉट आहे, जेथे पुढील 17 दिवसांत प्रकरणे दुप्पट होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार गोपाळ शेट्टी यांनी जागेची विचारणा केली होती. त्यांनतर आम्ही नवीन इमारतच सोपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी आधी बुकिंग झालेल्या फ्लॅट्सच्या मालकांना विचारण्यात आले होते, पण अगोदरच मालकी कागदपत्रे त्यांच्या नावे झाल्याने संघवी यांनीसंबंधित मालकांना महिन्यानुसार भाडे देऊन ही जागा पुन्हा घेतली आहे.
ANI ट्विट
Maharashtra: A pvt builder hands over a 19-storey newly constructed, ready-to-move-in building to Municipal Corporation of Greater Mumbai. Mehul Sanghvi, builder says, "We decided willingly after discussing with tenants. It's being used as quarantine centre for #COVID patients." pic.twitter.com/PVhkR8ltfr
— ANI (@ANI) June 21, 2020
मालाडमधील एसव्ही रोडवर ही इमारत स्थित आहे, यात 130 फ्लॅट आहेत काही दिवसांपूर्वी हा निर्णय झाल्यावर या ठिकाणच्या फ्लॅट्स मध्ये एकूण 300 रुग्ण (एका फ्लॅट मध्ये चार या हिशोबाने) दाखल झाले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता सद्य घडीला मुंबईत एकूण 64139 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत 3425 जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे तर 32264 जानाई कोरोनावर मात केली आहे.