Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज कोरोना व्हायरस (Coronavirus)  बाधित नवे 6 रुग्ण आढळले. त्यातील 5 मुंबई (Mumbai) शहरातील आहेत तर, एक नागपूर (Nagpur) येथील आहे. नव्या रुग्णांची भर पडल्यानंर राज्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 159 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने (Maharashtra Health Ministry) ही माहिती दिली. कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची एकूण संख्या 834 इतकी आहे. त्यातील 67 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत 748 रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सरसावले आहे. दोन्ही सरकारांनी जनतेच्या माध्यमातून कोरोना व्हायरविरुद्धचा लढा अधिक तीव्र केला आहे. राज्य आणि देशातील जनताही अपवाद वगळता या लढ्याला पाठिंबा देत आहे. जनतेसोबतच आता केंद्र आणि राज्या सरकारसोबतच देशातील स्वायत्त संस्थाही या लढ्यात उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामध्ये मग रिझरव्ह बँक ऑफ इंडिया असो, देशातील न्यायव्यवस्था असो की भारतीय निवडणूक आयोग असो. (हेही वाचा, Coronavirus in India: भारत देशात कोरोना व्हायरस बाधितांचा आकडा 834; तर कोरोनाचे एकूण 19 बळी)

ट्विट

कोरोना व्हायरस विरोधातील लढा कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील विविध नेते जनतेला अवाहन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष आणि महाविकास आघाडी प्रणेते शरद पवार यांनीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला विशेष संदेश दिला आहे. तसेच, राज्य सरकारला काही सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिथे असाल तेथेच राहा. गावी जायचा अथवा प्रवास करायचा विचार करु नका. पुढचे काही दिवस हे कोरोनाविरोधातील लढाई लढण्याचे आहेत. हे दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे आहेत, असे म्हटले आहे.