Punjab Medical Education & Research Minister OP Soni in Amritsar | (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हजूर साहिब (Hazur Sahib) येथून पंजाबला परत आल्यानंतर राज्यातील 137 जणांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती पंजाबचे आरोग्य आणि शिक्षण, संशोधन (Punjab Medical Education & Research) मंत्री ओ.पी. सोनी (OP Soni ) यांनी अमृतसर येथे दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ओ पी सोनी यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. नांदेड येथे असलेल्या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणावर दोन्ही राज्यांमध्ये येजा करत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात आज (1 मे 2020) दिवसभरात कोरना व्हायरस (COVID-19) संक्रमित 1008 नवे रुग्ण आढळले. तर, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 11,506 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 485 इतकी झाली आहे. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असतानाच पंजाबच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती पाहता चिंता अधिक वाढली आहे. कारण, नांदेड जिल्ह्यातील नागरिक पंजामधील 'त्या' रुग्णांच्या संपर्कात तर आले नाहीत ना? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. (हेही वाचा, Lockdown: 17 मे पर्यंतच्या लॉकडाऊन काळात काय सुरू राहणार? काय बंद राहणार? जाणून घ्या)

एएनआय ट्विट

दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रासोबतच भारतातील कोरोना व्हायरस रुग्णांचीही आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या शेवटच्या अद्यवावत माहितीनुसार गेल्या 24 तासात देशभरात तब्बल 1755 नवे रुग्ण सापडले आहेत. तर, 77 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 35365 इतकी झाली आहे. यात उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटल्याने रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आलेल्या 9064 जणांचाही समावेश आहे. तसेच देशभरातील कोरना संक्रमित एकूण 1152 मृतांचाही या आकडेवारीत समावेश आहे.