Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांवर सर्वोतोपरी उपचार वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून केले जात आहेत. तसेच राज्य सरकारसुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध नियमांची अंमलबाजवणी करत आहेत. राज्यात पुढील काही दिवस लॉकडाउन कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला होता. महाराष्ट्रात सर्वाधित कोरोनाचे रुग्ण असून आकडा 6 हजारांच्या पार गेला आहे. तर आता मुंबईतील NIA मधील एका सहाय्यक उपनिरिक्षकाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच या सहाय्यक निरिक्षकाच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी स्वत:हून क्वारंटाइन करावे असा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे. त्याचसोबत सर्व प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे ही एनआयए यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

मुंबईत आज कोरोनाचे 357 नवे रुग्ण तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4589 वर पोहचला असून 179 बळी गेला आहे. याच पार्श्वभुमीवर नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानंतर आता एनआयए मधील एका सहाय्यक उपनिरिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.(Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 394 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या 6817 वर)

दरम्यान, राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारकडून वेळोवेळी त्यासंदर्भात सुचना जाहिर केल्या जातात. तसेच क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर होम क्वारंटाइनचा सल्ला दिला जातो. त्याचसोबत डॉक्टर्स, वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत.त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास घाबरुन जाऊ नये असे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांच्या पार गेला आहे. मात्र येत्या 3 मे नंतर लॉकडाउन संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय देणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.