Jalna: जालना येथे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरणारे परिसर सील केले जाणार- राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) हादरून सोडले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, काही जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. याचपार्श्वभूमीवर जालना (Jalna) जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव दिसत आहे, असे परिसर सील करण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक महत्वपूर्ण सूचना देखील दिल्या आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 34 हजार 848 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 960 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या 53 लाख 44 हजार 63 वर पोहचली आहे. यापैकी 47 लाख 67 हजार 53 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 80 हजार 512 रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. राज्यात सध्या 4 लाख 94 हजार 32 अक्टिव्ह रुग्ण आहेत. हे देखील वाचा- Mucormycosis: महाराष्ट्रातील म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत वाढ, राजेश टोपे यांचे प्रशासनास निर्देश

महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि परिचारिकांचे स्वतंत्र पथक करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तसेच म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.