Coronavirus (Photo Credits: PTI)

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. वारंवार सुचना देऊन सुद्धा नियमांचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर कारवाई केली जात आहे. अशातच आता पालकांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. त्यानुसार राज्यात 10-20 वयोगटात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. याबद्दलची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली आहे. पुढे लहाने यांनी असे म्हटले आहे की, मार्च महिन्यात जवळजवळ 55 हजार कोरोनाग्रस्त हे 10-20 वर्ष वयोगटातील आढळून आले आहेत.(मुंबई: COVID 19 बाबत जनजागृती पसरवण्यासाठी Mona Lisa, Frida Kahlo, Marilyn Monroe, Statue of Liberty यांच्या ग्राफिटी सह सजल्या JJ Hospital च्या भिंती)

एबीपी माझा सोबत बोलताना लहाने यांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर नव्या ट्रेंडमुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वीच्या स्ट्रेनमुळे चार ते पाच लोकांना त्याची लागण होत होती. मात्र आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे10 पेक्षा अधिक जणांना त्याचा संसर्ग होत आहे. त्याचसोबत आधी 50 हून अधिक वय असलेल्यांना कोरोनाची लागण व्हायची. मात्र आता 20-40 वयोगटाच्या आत मधील लोकांनासुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत आहे.(मुंबईतील Covid War Room चे अद्ययावत दूरध्वनी क्रमांक)

दरम्यान,राज्यात डबल म्युटंट कोरोना वायरस पसरत असल्याने केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन टाळून जनजीवन सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी 'टेस्टींग' वर भर देण्याचा प्रशासनाचा, आरोग्य यंत्रणांचा सल्ला आहे. म्हणून अधिकाधिक लोकांनी कोविड 19 टेस्टिंगमध्ये सहभाग घेत आता वेळीच संसर्ग आणि आजार ओळखल्यास संक्रमण आटोक्यात ठेवण्यात मदत होणार आहे. सध्या राज्यात मिशन टेस्टिंग सुरू आहे. नागरिकांनी महागड्या दरामुळे टेस्टिंगपासून दूर राहू नये याकरिता महाराष्ट्रात RT PCR सोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज टेस्टिंगचे दर देखील कमी केले आहेत.