Cordelia Cruise Drug Case: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू
Prabhakar Sail | (Photo Credit: ANI)

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग (Cordelia Cruise Drug Case) प्रकरणातील एनसीबीचा (NCB) पंच साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail ) यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील चेंबुर येथील माहुल परिसराती राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कॉर्डेलिया प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (Narcotics Control Bureau) पथकाने अटक केली. त्यानंतर प्रभाकर साईल जोरदार चर्चेत आले होते. प्रभाकर साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (31 मार्च) त्यांचे निधन झाले. प्रभाकर साईल यांचा मृतदेह सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील निवासस्थानी आणले जाणार आहे. येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

आर्यन खान प्रकरणात प्रभाकर साईल यांनी अनेक धक्कादायक दावे आणि आरोप केले होते. ज्या वेळी आर्यन खान याला अटक करण्यात आली त्या वेळी आपण त्या क्रुझबाहेर उपस्थित होतो, असा दावा करत साईल यांनी खळबळ उडवून दिली होती. आपणास या प्रकरणातील अनेक गोष्टी ठाऊक आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा करत साईल यांनी संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. (हेही वाचा, Cordelia Cruise Drugs Case: कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाकडून एनसीबीला मुदतवाढ)

ट्विट

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खान याला अटक झाल्यावर सर्वाधिक चर्चेत आलेल्या किरण गोसावी याचा सुरक्षा रक्षक म्हणूनही प्रभाकर साईल प्रसारमाध्यमांसमोर आला होता. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने त्याकडे अवघ्या भारताचे लक्ष लागले होते. इतकेच नव्हे तर या प्रकरणात कारवाई करणारे एनसीबी अधिकारी समी वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप झाल्याने हे प्रकरण अधिक चर्चेत होते. धक्कादायक म्हणजे आर्यन खान याला सोडण्यासाठी शाहरुख खान याच्याकडे तब्बल 25 कोटी रुपयांची मागणी मद्यस्थांद्वारे केली होती, असा दावा साईल याने केला होता. एनसीबी अधिकारी समी वानखेडे यांच्या सांगण्यावरुन आर्यन प्रकरणात आपण कोऱ्या कागदावर स्वाक्षरी केल्याचेही साईल याने म्हटले होते.