Mumbai: कॉनस्टेबल मधुकर आव्हाड ह्याने एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला शनिवारी अटक करण्यात आली आहे. तसेच पीडित महिला एका दुकानातून चॉकलेट चोरत असताना तिला ही अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी (6 फेब्रुवारी) आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिने आपल्यावर मुंबईतील एका लॉजवर बलात्कार झाल्याचे सांगितले आहे. तसेच कॉन्सटेबल मधुकर आव्हाड असे त्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. मात्र आव्हाड ह्याने पीडित महिलेला धमकी देत कोणाला बलात्काराबाबत सांगण्यास मनाई केली होती. तर पोलिसांनी आरोपीला अंधेरी पोलिस कोठडीत दोन दिवसांसाठी ठेवण्यात आले होते.
या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या नवऱ्याच्या मोबाईलवर आपल्यावर बलात्कार झाल्याचे फोटो पाठवले होते. तसेच या फोटोच्या आधारे आरोपी आव्हाड ह्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. नवऱ्याने फोटोंच्या सहाय्याने या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी आव्हाड ह्याला कामावरुन सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.