Mumbai Rail Roko: मुंबईत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दादर स्टेशनमध्ये रुळांवर उतरले, ट्रेन अडवून दिल्या घोषणा

मुंबईत (Mumbai) तलाठी भरतीविरोधात (Talathi Bharati) काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत रेल रोको (Rail Roko) करण्यात आली आहे. तलाठी भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोपी युवक काँग्रेसने (Youth Congress) केला आहे. या प्रकरणाची सखोल एसआयटी (SIT) चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. यासाठी दादर रेल्वे स्थानकात ट्रेन अडवण्यात आली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चर्चगेटवरून विरारकडे जाणारी ट्रेन थांबवली आहे. (हेही वाचा - Rohit Pawar On Competitive Examination Fees: खासगी कंपन्यांचे खिशे का भरले जातात? विधानसभेत रोहित पवारांच्या 'या' मुद्द्यावर सोशल मीडियावर रंगली चर्चा (Watch Video))

पाहा पोस्ट -

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेवर चढून, रुळावर उतरुन रेलरोको केला आहे. पोलिसांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी समजूत काढणाचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनामुळे दादर रेल्वे स्थानकात एकच गोंधळ निर्माण झालाय. आंदोलन शांत करण्यासाठी पोलिसांसह आरपीएफ जवान रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत. तसेच सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय.

संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे साधारण पुढील ४० ते ५० मिनिटे रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.