कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे (Comrade Shripad Amrit Dange) यांच्या कन्या, साम्यमवादी ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड रोझा देशपांडे (Comrade Roza Deshpande) यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबई (Mumbai) येथील दादर (Dadar) परिसरात राहत्या घरी आज (19 सप्टेंबर) दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वासघेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले असले तरी गेल्या काही काळांपासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारी होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. त्या , कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Communist Party of India) च्या सदस्या होत्या.
रोझा देशपांडे यांचे साम्यवादी चळवळीत मोठे स्थान होते. पाचव्या लोकसभेत त्या खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या कन्या होत्या. परंतू, त्याही पलीकडे जाऊन त्यांनी आपली स्वतंत्र ओळख आपल्या कार्यातून केली होती. 1980 ते 1987 या काळात कम्यूनिस्ट पार्टीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. वडिल कॉ. एस. ए. डांगे यांच्याप्रमाणेच त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या सदस्य राहिल्या.
पाचव्या लोकसभेसाठी कॉ. रोझा देशपांडे यांनी त्या वेळच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. राजकारण हा त्यांचा एकच प्रांत नव्हता. राजकारणासोबतच त्यांनी लेखणही सुरु ठेवले होते. त्यांनी लिहिलेले ‘एस. ए. डांगे : एक इतिहास’ हे पुस्तक विशेष गाजले. (हेही वाचा, Sardar Tara Singh Passes Away: भाजपा नेते सरदार तारा सिंह यांचे निधन; किरीट सोमय्या यांची ट्विटद्वारे माहिती )
प्राप्त माहितीनुसार, रोझा देशपांडे या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. वाढत्या वयानुसार त्या वृद्धापकाळातच होत्या. मात्र, एप्रिल महिन्यात त्यांच्या शरीरातील सोडीयमचे प्रमाण कमी झाले होते. त्यासोतच त्यांच्या फुफ्फुसातही संसर्ग झाला होता. त्यांच्यावर दादर येथील सुश्रृषा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
रोझा देशपांडे यांच्या निधनामुळे साम्यवादी चळवळीतील एक उमदे आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले अशी भावना व्यक्त होत आहे.