उत्तरेकडून वाहणारे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने राज्यात हुडहुडी शुक्रवार (8 फेब्रुवारी) आणि शनिवारी (9 फेब्रुवारी) रोजी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर अहमदनगर येथे तापमानाचा पारा 9.9 अंश सेल्सिअसने खाली गेल्याने राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात कोकण, गोवा आणि विदर्भात हवामान कोरडे राहणार असून मुंबईत आज आणि उद्या तापमान हे 28 ते 17 अंशापर्यंत राहणार आहे. तर गोव्यात 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान तापमान संपूर्ण राज्यात कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडून वारे वेगाने वाहू लागल्याने त्याचा परिणाम कोकणच्या किनारपट्टीलगतच्या भागावर जास्त होणार असल्याने तेथे थंडीचे तापमानात वाढ होणार आहे. (हेही वाचा-पारा घसरला, महाराष्ट्र गारठला; निफाड येथे 1.8 निचांकी तापमानाची नोंद)
पुढील शहरातील तापमान हवामान खात्याच्या अंदजानुसार,
अलिबाग- 15, रत्नागिरी-17.9, पणजी-20, डहाणू- 16.7,पुणे- 10.5, महाबळेश्वर-10.6, सातारा-11.8, नाशिक-13.2 अंश सेल्सिअस