CNG & Cooking Gas Price Hike: कंम्प्रेस नॅच्युरल गॅस (CNG) च्या किंमतीत 2.50 प्रति किलोने वाढ झाली आहे. यामध्ये टॅक्सचा सुद्धा समावेश आहे. तर रविवारच्या (9 जानेवारी) सकाळपासून पाइप कुकिंग गॅसचे दर 1.50 प्रति युनिटने वाढले आहेत. तर गेल्या एका वर्षात म्हणजेच फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान सीएनजीचे दर मुंबई मेट्रोपोलिटन भागात तब्बल 18 रुपयांपर्यंत वाढले गेले आहेत.(Mumbai: बेस्ट बसच्या आणखी 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण)
सार्वजनिक वाहतूक जसे ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बस या सीएनजीवर चालत असल्याने त्यांना याचा अधिक फटका बसणार आहे. तर विविध युनियनकडून टॅक्सीचे भाडे 5 रुपये तर रिक्षाचे 2 रुपयांनी वाढवावे अशी मागणी करत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे युनियनकडून अशी ही मागणी केली जात आहे की, पूर्वीसारखे इंधन दर केल्याचे भाडे वाढीचा फटका प्रवाशाला बसणार नाही.
मुंबईतील रिक्षाच्या युनियनचे प्रमुख शशांक राव यांनी असे म्हटले की, सरकारने जर इंधनाचे दर यापूर्वी सारखे केल्यास ते भाडेवाढ टाळू शकतात. मात्र पुन्हा एकदा जर भाडेवाढ झाल्यास नागरिक त्याला विरोधच करतील. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(Indian Railway Charge: लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महाग होण्याची शक्यता, सरकार प्रवाशांकडून आकारणार स्टेशन विकास शुल्क)
सीएनच्या सर्व टॅक्सच्या समावेशासह मुंबई मेट्रोपोलिटन भागात सुधारित किमती रविवारी सकाळपासून 66 रुपये प्रति किलो तर पाइप गॅसची किंमत 39.50 प्रति युनिट अशी होणार आहे.