![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/04/Shiv-Sena-Chief-Uddhav-Thackeray-380x214.jpg)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सासरे माधव पाटणकर (Madhav Patankar) यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते 78 वर्षांचे होते. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे वडील माधव पाटणकर हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. ते व्यावसायिक होते. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे माहेर डोंबिवली शहरात आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ही दु:खद बातमी शेअर केली आहे. आज (15 जून) ट्वीटर वरुन त्यांनी माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधव पाटणकर यांच्यावर अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.
सुप्रिया सुळे ट्वीट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली. @OfficeofUT
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2020
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे सासरे व रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनामुळे पाटणकर व ठाकरे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.भावपूर्ण श्रद्धांजली.' असं ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे.
उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा 1989 साली विवाह झाला. त्यानंतर रश्मी ठाकरेंचा सक्रिय राजकारणामध्ये थेट समावेश नसला तरीही अनेक सभांमध्ये त्या सहभाग घेतात. सध्या रश्मी ठाकरे यांच्यावर सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक पदाची जबाबदारी आहे. दरम्यान 1 मार्च 2020 पासून उद्धव ठाकरे यांच्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्विकारली आहे.