गिरणी कामगारांच्या 3 हजार 894 घरांसाठी आज निघणार सोडत;  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार घोषणा
Building | Image of a construction site used for representational purpose | Image: Flickr

मुंबई मधील बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल (Bombay Dyeing Textile Mill) , बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल (Bombay Dyeing Spring Mill) ,श्रीनिवास मिल (Shrinivas Mill)  या जागी बांधण्यात आलेल्या 3 हजार 894 सदनिकांसाठी आज 1 मार्च राजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे. या सोडतीसाठी तीन मिल मधील तब्बल 17 हजार गिरणी कामगार आपले नशीब आजमवणार आहेत, सकाळी 11  वाजता उद्धव ठाकरे ही सोडत जाहीर करतील. वांद्रे पर्व येथी गृहनिर्माण म्हाडा कार्यलयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील बंद पडलेल्या गिरण्यांमुळे रोजगार गमावलेल्या कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय आहे. याअंतर्गत गिरणी कामगारांना मुंबईत २२५ चौरस स्क्वेअर फूट जागेत 1 बीएचके घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, या इमारती सुद्धा अद्ययावत असतील अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल येथे 720 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. तर, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल येथे 2630 इतकी आणि श्रीनिवास मिल येथे 544 घरांची उभारणी झाली आहे, या सर्व जागाांवर या तीन ही बंद पडलेल्या गिरणीतील कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबाबत एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुंबई शहरात आणि उपनगरात वापरात नसलेली सुमारे 70 एकर जमीन पडून आहे. त्या जमीनीची पाहणी करुन ती ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत या जमीनीवर योग्य पद्धतीने वापर केला तर सुमारे 35 हजार घरे उपलब्ध होऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले होते.