CM Uddhav Thackeray Interview: केंद्रातील एनडीए सरकार  30-35 चाकांची रेल्वेगाडी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: YouTube)

राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे तीनचाकी रिक्षा आहे, असा उपहासात्मक उल्लेख करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जोरदार टोला लगावला आहे. हे सरकार तीनचाकी आहे. तीन चाकी... तर तीन चाकी. पण ती चाकं चालताहेत ना एका दिशेनं. मग तुमच्या पोटात का दुखतंय! पण, केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तीन पक्षांच सरकार आहे. केंद्रात कती पक्षांच सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए (NDA) मीटिंगला गले होतो तव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना लगावला आहे.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, रिक्षा हे गरिबांचं वाहान आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करुन घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रनच्या मागे उभा राहीन. मी एवढंच म्हटलं, मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीन विचार करेन. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी करणार नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Interview: तुम्हाला 'यम' हवा की 'संयम' हवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मुखपत्र सामना (Daily Saamana) या दैनिकासाठी मुलाखत दिली या वेळी ते बोलत होते. सामनाचे संपादक, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली. ही मुलाखत काही भागांमध्ये प्रकाशित आणि प्रसारित होत आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आला आहे.