महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेले मुंबई (Mumbai) शहर आता नियंत्रणात आले आहे. मात्र, पुण्यातील (Pune) कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. यामुळे पुण्यात जम्बो रुग्णालय (Jumbo COVID19 Hospitals) उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील पहिल्या जम्बो रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. सामाजिक जागृती आणखी प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. रुग्णालयातील सुविधा अशाच पडून राहू नयेत, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यावेळी अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ यासह अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
“पुण्यातील या जम्बो रुग्णालयात 600 ऑक्सिजन बेड्स आणि 200 आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. हे रुग्णालय 19 दिवसात उभे करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळपासून हे रुग्णालय सुरु केले जाईल,” असे अजित पवार म्हणाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन जम्बो रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. तसेच खाजगी रुग्णालयात आकरले जाणारे बिल सरकारी दरानुसार आहेत की नाही? याचीही तपासणी केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. हे देखील वाचा- COVID-19 Cases in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिक, रायगडसह तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोनाचे रुग्ण? पाहा आजचे ताजे अपडेट्स
ट्वीट-
CM Uddhav Balasaheb Thackeray inaugurated a 800 bed jumbo COVID facility in the presence of Deputy CM @AjitPawarSpeaks in Pune today. Equipped with 200 ICU beds, oxygenated beds, negative pressure provisions, this facility will prove crucial for curtailing COVID infection rates.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 23, 2020
पुणे (Pune) येथे शनिवारी संध्याकाळपर्यंत आणखी 1 हजार 577 नव्या कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 33 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 170 वर पोहचली आहे. तर, 1 हजार 427 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे कोरोनामुक्तांची एकूण संख्या 65 हजार 346 वर पोहचली आहे.