उद्धव ठाकरे यांचे सासरे, रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांच्या निधनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित पवार यांनी पत्रातून वाहिली श्रद्धांजली
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ( फोटो सौजन्य- ट्विटर )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांचे सासरे आणि दैनिक सामना च्या संपादक रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)  यांच्या वडिलांचे म्हणजेच माधव पाटणकर (Madhav Patankar)  यांचे आज 15 जून रोजी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. यानंतर अनेक राजकीय मंडळींनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सांत्वन करत ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी सुद्धा काही वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र पाठवून माधव गोविंद पाटणकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. सोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit  Pawar) यांनी सुद्धा ठाकरे दांपत्याला आधार देत पत्र पाठवले आहे.

अजित पवार यांनी पत्रातून रश्मी ठाकरे यांना पितृवियोगाचे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाकरे आणि पाटणकर कुटुंबियांच्या दुःखात सामील आहेत असेही म्हटले आहे. काही वेळेपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ट्विट करून माधव पाटणकर यांना श्रद्धांजली वाहिली होती.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंचे पत्र 

अजित पवार ट्विट

रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीत आहे. वडील माधव पाटणकर हे प्रसिद्ध उद्योगपती आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माधव पाटणकर हे मागील काही दिवसांपासून आजारी होते त्यांच्यावर अंधेरी येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.ते ७८ वर्षाचे होते.

रश्मी ठाकरे हे नाव सुरुवातीपासून प्रत्यक्ष राजकारणात नसले तरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सून म्हणून ओळखीत आहे. शिवसेनेच्या सर्व सभांना रश्मी यांची नेहमी उपस्थिती असते, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यापासून त्या आता सामना च्या संपादक म्हणून काम पाहत आहेत.