Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पाठीमागील एक दोन वर्षांपासून राज्यासमोर अनेक आव्हाने आली आहेत. राज्य सरकारला विविध संकटांना तोंड द्यावे लागत आहे, अशा स्थितीतही जनतेला दिलासा देणारा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2022) सादर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray On Budget) राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल. जे जे शक्य ते ते सर्वकाही करण्याचा प्रयत्न. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेला डोळ्यासमोर ठेऊन सादर केला आहे. राज्यातील माता, भगीणी आणि बांधवांना हा अर्थसंकल्प आवडेल अशी मला खात्री आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळात 2022/23 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर होत असताना मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित होते. पाठिमागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारमामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीची मोठी चर्चा झाली. विरोधकांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या वेळी मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता होती. (हेही वाचा, Maharashtra Budget 2022 Highlight: कृषी, सिंचन, नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान; अजित पवार यांच्याकडून MVA सरकारचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर)

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री अर्थसंकल्पावर विधिमंडळात काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला दणदणीत यश मिळाले. त्यामुळे विरोधी पक्ष अधिक आत्मविश्वासात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला अधिकच धारेवर धरण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री कसे प्रत्युत्तर देतात याबाबत उत्सुकता आहे.