मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत युतीधर्मावर सेनेच्या मंत्र्यांनी त्यांच्या असलेल्या नाराजीला वाचा फोडली. या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांनी आपली युतीमध्ये होत असलेली धगधग बोलून दाखवली. नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे (Eknath Shinde) केली. खासदारांवर अन्याय होणार नाही असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना आणि नेत्यांना विश्वास दिल्याची माहिती आहे. (हेही वाचा - Eknath Khadse Joins BJP: एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार, भाजप प्रवेश झाला निश्चित)
लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत यावर चर्चा केली. इतर पक्ष आपल्या जागेवर दावा करतात त्यावर आमदारांनी आग्रही भूमिका मांडली. ही निवडणूक लढवताना इतर पक्षातील नेत्यांशी कसे संबध असावेत यावर चर्चा झाली. काही अडचणी येत असतील तर एक वेगळी विंग तयार केली आहे. तीनही पक्षाचे प्रतिनिधी एकमेकांशी संपर्क साधत राहतील. असे देखील या बैठकीत ठरले.
युतीमध्ये जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. आम्हांला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. कोणी किती जागा लढवल्या त्याने फरक पडत नाही. भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याने एक दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही, असे विधान यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी केले