CM Devendra Fadnavis and Amitabh Bachchan

Floods in Maharashtra 2019: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना तब्बल 51 लाख रुपयांची मदत केली आहे. ही मदत खास करुन सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आहे. अमिताभ यांनी आपल्या मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (CM Relief Fund) जमा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या मदतीबद्दल ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा वेढा पडला आणि होत्याचं नव्हतं झालं. गेली अनेक वर्षे उभा असलेले संसार, घरं, शेती, दुकानं, घरं आणि रस्ते सारं काही उद्ध्वस्त झालं. असे असले तरी, पुरग्रस्त नागरिक मोठ्या हिमतीनं उभे राहू पाहात आहेत. उद्धस्त झालेलं आपलं जग नव्याने निर्माण करु पाहात आहेत. अशा स्थितीत, सामाजिक संस्था, व्यक्ती आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर आदींकडून आता मदतीचाही महापूर येऊ लागला आहे.

सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात महापुराने घातलेल्या थैमानामुळे मोठा अनर्थ घडला. अनेकांच्या संसाराची दुर्दशा झाली. काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. पाळीव आणि इतर प्राण्यांचे तर किती बळी गेले याची गणतीच नाही. अशा स्थितीत आता हे पूरग्रस्त पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. शहरं, गावं, वाड्या, वस्त्या पुन्हा नव्याने उभारण्यासाठी स्वच्छता, साफसफाई आणि पुनर्बांधनीला वेग आला आला आहे. अशा स्थितीत विविध संस्था, संघटना आणि व्यक्तिंकडून मिळणारी मदत ही लाखमोलाची ठरत आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी चित्रपटसृष्टी काहीशी पाठीमागे होती. मात्र, चौफेर टीका झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवुडमधील काही कलाकारांनी पुरग्रस्तांच्या हाकेला धाऊन जात मदत देण्याचा निर्णय घेतला. अर्थात, काही कलाकांरांनी टीका होण्यापूर्वीच पुरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे केला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट

दरम्यान, मुंबईचे डबेवाले, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, बॉलिवुड अभिनेते तसेच अनेक उद्योजक, सामाजिक संस्था यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आर्थिक मदत पोहोचवली आहे. तर, दुसऱ्या बाजूला काही व्यक्ती, सामाजिक संस्था आदी मंडळींनी थेट घटनास्थळावरच मदत पोहोचवली आहे. त्यामुळे काही मंडळींनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत न पोहोचवतात थेट पीडितांपर्यंतही आपली मदत पोहोचवताना दिसत आहेत.