मंगळवारी सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा भाजपाप्रवेश झालानंतर रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला गेले होते. रात्री उशिरा भाजपा आणि शिवसेना पक्षामध्ये आगामी निवडणूक कार्यक्रमांबद्दल, प्रचाराबाबत चर्चा झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. यामध्ये 24 मार्च पासून कोल्हापूर (Kolhapur) शहरातून भाजपा- शिवसेना युतीचा प्रचाराचा नारळ फूटण्याची शक्यता आहे.
Maharashtra: CM Devendra Fadnavis met Shiv Sena chief Uddhav Thackeray at the latter's residence in Mumbai last night. pic.twitter.com/PnkNIIY8p8
— ANI (@ANI) March 13, 2019
11 एप्रिलपासून महराष्ट्रामध्ये चार दिवस लोकसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. याकरिता लवकरच दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची यादी होणार आहे. महराष्ट्रात 48 जागांवर होणार्या लोकसभा निवडणूकींमध्ये शिवसेना 23 तर भाजपा 25जागा लढवणार आहे.