Bail Pola (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रामध्ये आज बैल पोळ्याचा (Bail Pola)  सण साजरा केला जात आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला तुफान पावसामुळे पूराचा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवासोबतच आज साजरा होत असलेल्या पोळ्यावरही त्याचं सावट आहे. मात्र महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मोठ्या आनंदाने बळीदात्याचा साथीदार असलेल्या बैलाप्रती ऋण व्यक्त करणारा हा बैलपोळ्याचा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात हिंगोलीमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांनी बैल पोळ्याचा आनंद साजरा केला. सध्या महाराष्ट्रामध्ये जनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री अनेक गावांना भेट देत आहेत. Bail Pola 2019 HD Images & Wallpapers: बैल पोळा सणाच्या शुभेच्छा देणारी HD Images, Greetings शेअर करून साजरा बळीराजाचा सण!

हिंगोलीमध्ये साजरा केला बैल पोळ्याचा सण

( नक्की वाचा:  Bail Pola 2019: बैल पोळा सण महाराष्ट्रात श्रावण अमावस्या दिवशी साजरा करण्याचं महत्त्व काय? जाणून घ्या पूजा विधी आणि परंपरा)

हिंगोलीमध्ये आज परंपरेनुसार बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली. बैलांना गोडाचा नैवैद्य दाखवण्यात आला आहे. यापूजेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सहभाग घेत आजाचा सण साजरा केला. गणेशोत्सवानंतरमहाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी महाराष्ट्रात इच्छुकांचे पक्षांतर सुरू झाले आहे.