 
                                                                 गोवंडी मधील शताब्दी हॉस्पिटलला (Shatabdi Hospital) कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सफाई कर्मचारी ईसीजी काढताना आढळल्यानंतर हॉस्पिटलला नोटीस देण्यात आली आहे. ही 29 डिसेंबरची घटना आहे. वकील Abid Abbas Sayyed यांनी ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसी मध्ये मुख्यमंत्र्यांसह सार्वजनिक आरोग्य खात्याचा देखील समावेश आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, वकील सय्यद यांनी रूग्णांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच violation of medical protocols असल्याचं म्हटलं आहे. हॉस्पिटल कडूनही आरोपांचं खंडन करण्यात आलेले नाही. त्यांनी कर्मचार्याची बाजू घेतली आहे. 'तो सफाई कर्मचारी असला तरीही तो शिक्षित आहे आणि टेस्ट करण्याइतपत त्याला माहिती आहे.' हॉस्पिटलच्या कर्मचार्याने दिलेल्या माहितीनुसार ईसीजी मशीन हे केवळ एका बटणावर चालते. त्या कर्मचार्याने केवळ बटण दाबले आहे. रिपोर्ट्स हे प्रोफेशनल डॉक्टर्स कडून काढले जातात. त्यासाठी असलेली प्रक्रिया फॉलो केली जाते. तसेच त्यांनी ही घटना केवळ 'गैरसमज' असल्याचं म्हटलं आहे.
हॉस्पिटल कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तो रूग्ण केवळ रेग्युलर चेक अप साठी आला होता. त्याची अवस्था चिंताजनक नव्हती. रूग्णालयात दिल्या जाणार्या सेवांच्या क्वॅलिटीवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. त्यांनी नोटीसी मध्ये रूग्णांच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा देखील प्रश्न विचारला आहे. Mumbai Shocker: रुग्णालयातून बाळाची चोरी, खळबळजनक घटनेचा व्हिडिओ आला समोर, कांदिवलीतील घटना.
वकील सय्यद यांनी प्रशासनाला याबद्दल चौकशीची विनंती केली आहे. रुग्णांना दर्जेदार सेवा पुरवली जावी यासाठी आरोग्य सेवा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. "रुग्ण पात्र आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून उपचार घेण्याची अपेक्षा करतात आणि पात्र आहेत आणि अशा घटनांमुळे निष्काळजीपणाची चिंताजनक प्रवृत्ती दिसून येते," सय्यद यांनी त्यांच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
