CIDCO Lottery Result 2019: 'सिडको'च्या स्वप्नपूर्ती आणि मास हाऊसिंग घरांसाठी आज लॉटरी; सकाळी 10 पासून lottery.Cidcoindia.com वर कसा पहाल निकाल?
CIDCO | Photo Credits: Twitter and Pixabay.com

CIDCO Mass Housing and Swapnapurti Lottery 2019 Result: नवी मुंबईमध्ये घर घेण्याचं अनेक सामान्यांचं स्वप्न सिडकोच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आज नवी मुंबईत सिडकोच्या घरांसाठी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.  सकाळी 10 वाजता नेरूळच्या आगरी कोळी संस्कृती भवन येथे ही सिडकोच्या स्वप्नपूर्ती (Swapnapurti Lottery 2019 ) आणि मास हाऊसिंग (CIDCO Mass Housing) या दोन स्किम अंतर्गत योजनांसाठी घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन माध्यमातून सिडकोच्या अधिकृत वेबसाईट तसेच युट्युब चॅनलच्या माध्यमातूनही सिडको घरांची लॉटरी 2019 चा निकाल पाहता येणार आहे. आज सुमारे 10,000 घरांसाठी निकाल जाहीर केला जाणार आहे.

सिडको नवी मुंबईमध्ये सुमारे 2 लाख 10 हजार घरं बांधणार असून त्यातील पहिल्या टप्प्याची घरं बांधून तयार आहेत. स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील उर्वरित सुमारे 800 घरांसाठी यंदा 83 हजाराहून अधिक अर्ज आले होते. यंदा विधानसभा निवडणूकीच्या धामधूमीमध्ये या सिडको लॉटरीच्या निकाल आणि अर्ज दाखल करण्याला मुदत वाढ देण्यात आली होती.   सिडकोच्या घरधारकांना दिलासा, घरं आणि कमर्शिअल प्रॉपर्टी Lease Hold ऐवजी Free Hold करण्याचा निर्णय.

ऑनलाईन कसा पहाल सिडको स्वप्नपूर्ती आणि मास हाऊसिंग गृहप्रकल्पातील लॉटरीचा निकाल?

  • lottery.Cidcoindia.com ही सिडकोची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
  • त्यानंतर ‘View Lottery Result’ या लिंकवर क्लिक करा
  • CIDCO Lottery निकालासाठी त्यामध्ये अ‍ॅप्लिकेशन डिटेल्स भरा आणि तुमचा निकाल पहा.

वेळ: सकाळी 10 वाजल्यापासून

स्थळ: आगरी कोळी संस्कृती भवन - नेरूळ

सिडकोच्या10 हजार घरांच्या सोडतीसाठी सोमवारी रात्रीपासूनच आगरी-कोळी भवनात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई सह नवी मुंबईतही चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.