Cidco | (File Image)

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सिडको लॉटरीची घोषणा केली आहे. कोरोना महामारी काळात तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या सिडकोच्या 5730 घरांची सोडत (Cidco House Lottery) आज 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day) निमित्त काढण्यात आली. हा कार्यक्रम नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. सिडको घरे घेताना पंतप्रधान आवास योजनांच्या लाभार्थीनाही फायदा मिळणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, सिडकोची ही लॉटरी तळोजा नोडसाठी आहे. भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत गृहनिर्माण योजना सुरु होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करुन नोंदणी करता येणार आहेत. त्यासाठी 24 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असेल. या योजनेद्वारे जेवढी घरे बांधली जातील त्यापैकी 1524 घरं प्रधान मंत्री आवास योजने साठी उपलब्ध असतील. तर उर्वरित 4206 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध राहतील. (हेही वाचा, CIDCO 2022 Lottery: सिडको कडून जानेवारी 2022 मध्ये 5 हजार घरांसाठी लॉटरी निघणार; मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती)

ट्विट

सिडकोच्या या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आजपासून सुरु झाली आहे. ही मुदत 24 फेब्रुवारी पर्यंत असेल. नागरिकांना स्वस्तातले आणि हक्काचे घर मिळावे यासाठी ही योजना काम करते. या योजनेंतर्गत घरे मिळविण्यासाठी आज पासून जवळपास पुढील महिनाभर (24 फेब्रुवरी) पर्यंत मुदत असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सिडको योजनेतील घरांचा लाभ घ्यावा असे अवानह एकनाथ शिंदे यांनी केले आहे.