नवी मुंबईत सिडकोच्या 1100 घरांसाठीची सोडत आज जाहीर होणार आहे. या 1100 घरांसाठी तब्बल 58 हजार 786 अर्ज आले होते. नवी मुंबईतील 1100 घरांसाठी जानेवारी 31 पर्यंत घरांसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रीया सुरु होती.
घरांची सोडत 14 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता जाहिर बेलापूर येथील सिडको भवनमध्ये जाहीर करण्यात येईल. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबरला 14 हजार 838 घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. यात पत्रकार, माथाडी, मापाडी, सिडको कर्मचारी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या घरातून 100 घरे शिल्लक राहिली होती.
सिडको लॉटरीचा निकाल कसा पहाल?
सिडको लॉटरीचा निकाल www.cidco.maharashtra.gov.in आणि lottery.cidcoindia.com या वेबसाईट्सवर आज संध्याकाळी 6 नंतर पाहता येईल.
- cidco.maharashtra.gov.in किंवा lottery.cidcoindia.com या वेबसाईट्ना भेट द्या.
- view lottery result टॅबवर क्लिक करा.
- अॅप्लिकेशन नंबर सबमिट करा आणि भागानुसार निकालाची यादी पहा.
नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी भागातील घरांसाठी सिडकोने जानेवारी महिन्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरु केली होती.