CIDCO Lottery Result 2019: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरं या उद्दिष्टपूर्तीसाठी नवी मुंबईमध्ये सिडको कडून काही गृहप्रकल्प बांधण्यात आले आहेत. यामध्ये आज (26 नोव्हेंबर) सिडको 95 हजार घरांपैकी 9249 कुटुंबांना हक्काचा निवारा म्हणून सिडको घरांच्या लॉटरीचा निकाल जाहीर करणार आहे. सोबतच जुन्या 810 घरांसाठी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आज जाहीर केल्या जाणार्या सुमारे 10,059 घरांसाठीचा निकाल सकाळी 10 वाजल्यापासून घरबसल्या ऑनलाईन स्वरूपातही पाहता येणार आहे. यासाठी सिडकोकडून खास युट्युब चॅनलवर त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवण्यात येणार आहे. CIDCO Lottery Result 2019: 'सिडको'च्या स्वप्नपूर्ती आणि मास हाऊसिंग घरांसाठी आज लॉटरी; सकाळी 10 पासून lottery.Cidcoindia.com वर कसा पहाल निकाल?
सिडको कडून महाराष्ट्रात येत्या 5 वर्षांत दोन लाख घरं बांधली जाणार आहेत. यामधील 95 हजार घरे बांधणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील घरं टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
इथे पहा सिडको लॉटरी 2019 चे लाईव्ह स्ट्रिमिंग
दरवर्षी म्हाडा प्रमाणेच महाराष्ट्रात सिडकोकडूनही सामान्यांना परवडतील अशा दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागवले जातात. पुढे या घरांसाठी सोडत काढून त्यादिवशी भाग्यवंताची यादी जाहीर केली जाते. आज नेरूळच्या आगरी कोळी सांस्कृतिक केंद्रामध्ये या सिडकोच्या घरांसाठी लॉटरी निघणार आहे.