CIDCO | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Twitter)

CIDCO Navi Mumbai Lottery Result 2019:  सिडकोच्या नवी मुंबईमधील 9249 घरांसाठी उद्या (26 नोव्हेंबर) दिवशी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. या लॉटरीमध्ये 'मास हाऊसिंग' आणि 'स्वप्नपूर्ती' या दोन स्कीम अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा, खारघर भागातील घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. सकाळी 10 वाजल्यपासून या सोडतीला सुरूवात होणार असून अर्जदारांना lottery.cidcoindia.com या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.  सिडकोच्या घरधारकांना दिलासा, घरं आणि कमर्शिअल प्रॉपर्टी Lease Hold ऐवजी Free Hold करण्याचा निर्णय.

नवी मुंबईमध्ये पावणे, तुर्भे, बोनसरी, शिरवणे आणि कुकशेत या एमआयडीसी भागांमध्ये सिडको आता नवी घरं बांधणार आहेत. सध्या सिडकोने दिलेल्या जाहिरातीमध्ये 1 लाख 10 हजार घरांपैकी 62,976 घरं आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांसाठी तर 47,040 घरं अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील प्रत्येकाला हक्काचं घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत देशात 20 मिलियन घरं सामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. सुरूवातीला केवळ 9249 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली होती मात्र त्यानंतर नवी मुंबई मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.10 लाख घर उपलब्ध करुन दिली आहेत.

कसा पहाल CIDCO च्या घरांसाठी निकाल?

lottery.Cidcoindia.com ही सिडकोची अधिकृत वेबसाईट ओपन करा.

त्यानंतर ‘View Lottery Result’ या लिंकवर क्लिक करा

CIDCO Lottery निकालासाठी त्यामध्ये अ‍ॅप्लिकेशन डिटेल्स भरा आणि

तुमचा निकाल पहा.

सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सिडकोच्या घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर केला जाईल. म्हाडा पाठोपाठ सामान्यांना नवी मुंबईमध्ये किफायतशीर दरामध्ये घर उपलब्ध केली जाणार आहे.