प्रधानमंत्री आवास योजनेतील (Pradhan Mantri Awas Yojana) 'सर्वांसाठी घर' या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने सिडको (CIDCO Housing) कडून लाखो घरं उभारण्यात येणार आहेत. मुंबई, नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी त्यासाठी काम सुरू आहे. दरम्यान सिडको नववर्षामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे 65 हजार घरांची एकत्र सोडत जाहीर करणार आहे. अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात सोडत जाहीर करण्याची ही पहिलीच असल्याने अनेक सर्वसमान्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्कांचं घर घेण्यासाठी पर्याय खुला होणार आहे.
सध्या सिडको कडून तळोजा, कलंबोली, घणसोली, द्रोणागिरि इथे 14 हजार 838 घरांच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. कालच या घरांच्या आणि सिडकोच्या कामाची पाहणी करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी स्वतः साईट्सवर गेले होते. यावेळेस त्यांनी 2021 मध्ये सिडकोकडून 65 हजार घरांची सोडत जाहीर करू असे सांगितले आहे.
सिडकोची घरं कुठे असतील?
सिडकोकडून आगामी वर्षात वाशी ट्रक टर्मिनल्स, खारघर रेल्वेस्थानक, खारघर बस स्थानक, कळंबोली बस स्थानक, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, खांदेशवर, मानसरोवर, तळोजा, जुईनगर, नेरूळ, सानपाडा, सीबीडी बेलापूर, बामणडोंगरी अशा 27 महत्तवाच्या जागी 90 हजार घरं उभारली जाणार आहेत.
Site inspection of the One Lakh Affordable Houses Project under Pradhan Mantri Awas Yojana, arguably the largest scheme of its type in the world. pic.twitter.com/eJM8tIiTKo
— Dr. Sanjay Mukherjee (@DrSanMukherjee) November 20, 2020
सिडकोच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील भाग्यवान ग्राहकांना घराचा ताबा मार्च 2021 पर्यंत मिळणार आहे. दरम्यान सिडकोच्या विक्रमी सोडतीमुळे बांढकाम क्षेत्रात मुबलक प्रमाणात घरं उपलब्ध होतील. तसेच सर्वसामान्यांच्या हक्कांच्या घरासाठी किंमतीवर देखील त्याचा परिणाम होऊन हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.