चाईल्ड पोर्नोग्राफीवर बंदी तरीही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

चाईल्ड पोर्नोग्राफीला देशात बंदी असताना देखील लहान मुलांचे लैंगिक शोषण करुन त्यांची पोर्नोग्राफी फिल्म बनवून ती सोशल मीडियात व्हायरल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सिडको, सातारा आणि छावणी येथील परिसरात ही घटना घडली असून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या एका फेसबुक प्रोफाइलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीमधील नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांनी चाईल्ड पोर्नोग्राफीच्या विरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणी डिसेंबर महिन्यात कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सायबर क्राईम पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. मार्च महिन्यात सिडको येथे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ आणि डिसेंबर महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे समोर आले. ज्या व्यक्तीने हे कृत्य केले आहे त्याचे आयपी अॅड्रेस किंवा मोबाईल सिमकार्डचा वापर करुन अधिक तपास केला जात आहे. याबाबत News18 लोकमत यांनी वृत्त दिले आहे.चाईल्ड पोर्नोग्राफीला देशासह विदेशात सुद्धा बंदी आहे. मात्र काही ठिकाणी चोरीछुप्या रितीने याचे व्हिडिओ बनवून तो पोस्ट केले जातात. एवढेच नाही तर चाईल्ड पोर्नोग्राफी CD च्या माध्यमातून सुद्धा पसरवले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तर मुंबई  मधील महाविद्यालयातील तरुण-तरुणींच्या माध्यमातून करण्यात आलेल्या एका सर्व्हेच्या माध्यमातून धक्कादाक बाब समोर आली होती. रिपोर्टनुसार महाविद्यालयातील तरुण सर्वात जास्त पॉर्न फिल्म (Porn Film) पाहतात असल्याचे सांगण्यात आले होते.  तसेच एका आठवडाभरात 40 पॉर्न फिल्म पाहत असल्याचा ही खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला. रेस्क्यू रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्ट यांना हा सर्व्हे केला होता.