मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले 2 तरुणांचे प्राण; नेमके काय घडले? वाचा सविस्तर
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या कुटुंबासह सोमवारी रात्रीच पंढरपुरात (Pandharpur) दाखल झाले होते. स्वत: आठ तास गाडी चालवून पंढरपूरला पोचल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांसोबत विकासकामांची आढावा बैठक घेतली. यासाठी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. याआधी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका कामगिरीने सर्वांचे मन जिंकली आहेत. प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाईकस्वारांचा अपघात झाला. यासंदर्भात माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकाची गाडी व रुग्णवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. ज्यामुळे या दोन्ही तरूणांचा जीव वाचला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांचे निवासस्थान मातोश्रीवरून पंढरपूरकडे रवाना झाले आहे. त्यावेळी त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत होते. मात्र, या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला. त्यावेळी या गावाजवळ दोन दुचाकीस्वरांचा अपघात झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक वाहन आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. रुग्णवाहिका वेळेवर मिळाल्याने दोन्ही तरूणांचे प्राण वाचले आहेत. हे देखील वाचा-Uddhav Thackeray Cabinet Expansion: महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळण्याची आणि शिवसेना-NCP मध्येही बदलाची चर्चा

नीलम गोऱ्हे यांचे ट्वीट-

तसेच शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांनी संवेदनशील मुख्यमंत्री असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतूक होत आहे.