Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits:ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) हे एक जागतिक युद्ध आहे. या युद्धाचा सामान करताना आपण जनता म्हणून सरकारला सहकार्य करता आहात. घाबरुन जाण्याची गरज नाही. घाबरलेल्या स्थितीत युद्ध जिंकता येत नाही.कोरोना विषाणू (COVID-19) विरोधात लढले जाणारे हे जागतिक युद्ध आहे. आता मागे हटून चालणार नाही. सायरन वाजला आहे. युद्ध सुरु झालं आहे. आपण सरकारने दिलेल्या सर्व सूचना पाळून हे युद्ध जिंकण्यासाठी मदत करा, असे हृदयस्पर्शी अवाहन राज्याचे मख्यंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेला केले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आज (19 मार्च 2020) संबोधित केले. या वेळी ते बोलत होते.

जिवनावश्यक गोष्टींचा पुरेसा साठा

आपल्याकडे सर्व सुविधा आहे. आपल्याकडे जिवनावश्यक गोष्टींचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे जनतेने घाबरुन जाण्याची गरज नाही. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार सज्ज आहे. यंत्रणा जीवाची पर्वा न करता लढत आहेत. राज्यातील सरकारी कर्मचारी, आरोग्य यंत्रणा यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ते शर्थीने प्रयत्न करत आहेत. असे असताना मग कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपण सहकार्य करायला हवे. सरकारने केलेले अवाहन विचारात घेऊन नागरिकांनी सहकार्य करावे असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, अहमदनगर: Coronavirus संशयित रुग्णांची नावे व्हायरल केल्याप्रकरणी मनसे शॅडो कॅबिनेट मधील नेते संजीव पाखरे यांच्यावर गुन्हा दाखल)

एएनआय ट्विट

कोरोना व्हायरस हे आपल्यावर आलेले विदेशी संकट आहे.

सरकार काही लोकांना हातावर शिक्का मारुन विश्वासाने घरी पाठवत आहे. मात्र, यातील काही लोक घरात विलगिकरण कक्षात न राहता रस्त्यांवर फिरत आहे. अशा लोकांनी स्वत:ची समाजाची काळजी घेऊन घरात राहणे चांगले. राज्यातील मंदिर, मशिदी, चर्च, गुरुद्वारा ही सर्व प्रर्थनास्थळे बंध आहेत. नागरिक गर्दी टाळण्याचा प्रयत्न करत आहे, हे कौतुकाचे आहे. पण, तेवढेच पुरेसे नाही. गर्दी टाळण्यासाठी आणखी प्रयत्न करायला हवेत, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांच्याकडूनही राज्य सरकारला कोरोना व्हायरस संकटा विरोधात लढण्यासाठी चांगले सहकार्य होत आहे. काही गोष्टी राज्यात राबविण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता हवी असते. त्या मान्यताही केंद्र सरकार आवश्यक तशा देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनीही कोरोना व्हायरस विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी या युद्धात उतरण्याचे ठरवले आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी आणि राज्यातील आरोग्य विभाग, डॉक्टर्स, परिचारीका ज्ञात, अज्ञाात कर्मचारी आणि यंत्रणांचे कौतुक केले. हे सर्वजन युद्धात लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे काम करत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.