मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) प्रकरणी पुन्हा आवाज तीव्र होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात असलेल्या या प्रकरणामध्ये आता कोर्टाने इतर राज्यांना नोटीसी पाठवत त्यांच्याकडूनही आरक्षण प्रकरणी अहवाल मागवला आहे. यामध्ये आता खासदार उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhonsle) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काल त्यांनी ट्वीट करत “मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरु द्या,” अशा आशयाचं एक ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. Maratha Reservation Hearing: सर्वोच्च न्यायालयाचं 18 मार्च पर्यंतचं नियमित वेळापत्रक रद्द करत पुढील सुनावणी 15 मार्चला; इतर राज्यांना देखील आरक्षण प्रकरणी जाणार नोटीस.
आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे, हा वेळ अन्यायविरुध्द झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा. असे देखील उदयनराजे भोसले ट्वीट मध्ये म्हणाले आहेत.
उदयनराजे भोसले यांचे ट्वीट
मराठा समाजाला आरक्षण द्या अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या.
आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे, हा वेळ अन्यायविरुध्द झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी द्या. तातडीने मराठा आरक्षणचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा.https://t.co/SoyA9MxhUV pic.twitter.com/aINKDKMPx2
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) March 10, 2021
काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी एक पत्र देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख़्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते. मात्र 9 सप्टेंबर 2020 दिवशी महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.