Crime News: छत्रपती संभाजीनगर परिसररात मोठी खळबळजनक घटना घडली आहे. बापानेच आपल्या मुलाची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. पोलीसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. मुलगा दररोज दारू पिऊन वडिलांना शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा या घटनेला वैतागून वडिलांनी मुलाची हत्या केली. छावणी पोलीसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश राजू उफाड असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. राजू उफाड हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आकाश हा कुटूंबियासोबत पडेगावात राहत होता. राजू यांच्या कुटूंबात दोन मुले आणि पत्नी राहत होते. राजूचा मोठा मुलगा मजूरी करायचा तर आकाश काहीच कामधंदा करत नव्हता. घरी दारू पिऊन रोज भांडण करायचा. त्यामुळे घरात धिंगाणा व्हायचा. वडिलांना शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे हे रोजचं प्रकरण होतं. अनेकदा त्याला समाजावून सांगितले तरीही त्याने त्यांच्या सवयीत बदल केला नाही. वडिलांना या गोष्टी सहन झाल्या नाही त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
रात्री घरी कोणी नसताना, राजूने आकाशवर हल्ला फावडा घेवून हल्ला केला. अनेक वेळा वार केल्यामुळे राजू बाजीवर असताना, रक्तबंबाळ झाला. आणि काही क्षणातच त्याने प्राण सोडला. दुसऱ्या दिवशी राजू पोलीस ठाण्यात जावून आकाशला कोणीतीही अज्ञाताने मारल्याची खोटी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. पोलीसांनी या घटनेची चौकशी करत त्यांना वडिलांवर संशय आला. काही काळ त्यांना विचारपूस केल्यानंतर वडिलांनी पोलीसांना सारी हकिकत सांगितली. मारहाण, शिवीगाळाला कंटाळून हत्या केल्याची कबुली पोलीसांत देण्यात आली. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केले आहे.