Indian Marriage | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Chhatrapati Sambhaji Nagar News: लग्न हा कोणत्याही जोडप्याच्या आयुष्याला वळण देणारा प्रसंग. लग्न होताच नववधून नव्या घरात येते. तिचे कोडकौतुक होते. पण, हे राहिले बाजूलाच. नववधूनचे चक्क घरातील सोन्याचे दागिने आणि इतर ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना पुढे आली आहे. सदर घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. या घटनेनंततर वराकडील मंडळींनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात लग्नात मध्यस्थी करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा विवाह या मध्यस्थांच्या मदतीने ठरला होता. त्यांनीच पुढे होऊन या विवाहाचा घाट घातल्याची माहिती आहे.

घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर शहरातील रमनगर, विठ्ठलनगर परिसरात एक महिला राहते. या महिलेचा एक मुलगा लग्नाचा होता. त्यामुळे या महिलेने परिसरातच राहणाऱ्या दोघांना माझ्या मुलाच्या लग्नासाठी एखादी मुलगी असेल तर स्थळ सूचवा असे सांगितले होते. दरम्यान, या दोघांनी महिलेला एक स्थळ दाखवले. मुलाला आणि मुलाच्या आईलाही स्थळ पसंतक पडले. मध्यस्थांनी सासरच्या मंडळींना सांगिले की, विवाह करायचा असेल तर त्यासाठी मुलीला 1लाख 20 हजार रुपये द्यावे लागतील. शिवाय मुलीला 50 हजार रुपयांचे दागिणेही घालावे लागतील. वराच्या कुटुंबीयांनी ही बोलणी मान्य करत ठरल्या प्रमाणे व्यवहार केला. पैसे आणि दागिणे दिले. ठरल्यानुसार लग्न झाले. नववधून नांदायला आली. (हेही वाचा, Love Marriage Vs Arranged Marriage: प्रेमविवाह की अरेंज मॅरेज? अविवाहितांनो तुमचे प्राधान्य कशाला? जाणून घ्या फायदे-तोटे)

दरम्यान, नव्या नवरीने आपला कारनामा दाखवला. पाच मार्च रोजी दुपारी 3 च्या सुमारास नवविवाहितेने झंपर शिवण्याचा बहाणा करुन ती घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही. थोड्या वेळाने कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी नवविवाहितेचा शोध घ्यायला सुरु केले. पण ती आढळून आली नाही. त्यामुळे घरातल्यांनी दागिणे आणि पैसेही पाहिले तर तेही गायब. म्हणजेच नवविवाहीता दागिणे आणि पैसे घेऊन पसार झाली होती. दरम्यान, नवविवाहीता आणि मध्यस्थांविरुद्ध सासरकडील मंडळींनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन 28 एप्रिल रोजी गुन्हा नोंदवला. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.