Well | Representational image (Photo Credits: pxhere)

Chhatrapati Sambhaji Nagar Shocker: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या मोहरा येथील घटनेने सर्वांचे मन हेलावून टाकले आहे.मोहरा येथील 22 वर्षीय गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला आहे. पल्लवी दिनेश गाडेकर असे मृत महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, पल्लवी 9 महिन्यांची गर्भवती होती. (हेही वाचा- फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंचाने उधळले पैसे, व्हिडओ व्हायरल)

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी सह कुटुंब मोहरा गावातील शिवारात डोंगराच्या पायथ्याशी राहत होती. २७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास पल्लवी घराबाहेर कामानिमित्त गेल्या होत्या. परंतु बराच वेळ घरी परतल्या नाही त्यामुळे कुटुंबांनी चिंता व्यक्त करत पल्लवीची शोधाशोध घेतली.संपुर्ण गावात कुटुंबियांनी शोधाशोध घेतली.  त्यानंतर काही वेळाने तीचा मृतदेह राजेंद्र गाडेकर यांच्या गट नंबर १५० मधील विहिरीत आढळून आला.

तात्काळ विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पल्लवीला मृत घोषित केले. दरम्यान गर्भवती महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची बातमी गावात पसरली. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लीचा पती हा सैन्य दलात काम करतो.